व्यावसायिक चाट आणि स्नॅक्स कार्यशाळा

व्यावसायिक चाट आणि स्नॅक्स कार्यशाळा

पुणे, ता. २३ : चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. २५) व रविवारी (ता. २६) होणार आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कटवडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या व पराठ्याचे प्रकार कसे करावेत, हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये गोड व हिरवी चटणी, पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दही वडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅंडिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.
संपर्क : ९१४६०३८०३१

दुग्ध प्रक्रिया व्यवसाय कार्यशाळा
दूध प्रक्रिया व्यवसाय कसा सुरू करावा, या उद्योगातील संधी, दूध संकलन, साठवण, पारंपरिक आणि नवनवीन दर्जेदार दुग्ध पदार्थ कसे तयार करावे, यंत्रसामग्री, प्रकल्प आराखडा, मार्केटिंग, पॅकेजिंग, ब्रॅंडिंग, अन्न प्रशासन परवाने, बँक फायनान्स आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. २५) व रविवारी (ता.२६) होणार आहे. दुधाचा, दुग्धपदार्थांचा दर्जा उत्तम कसा राखावा, त्यातील भेसळ कशी ओळखावी यांसह यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजकांचे अनुभव ऐकण्याची संधी आहे. पनीर, खवा, पेढा, लस्सी या पदार्थांचे थेट प्रात्यक्षिक पाहता येईल.
संपर्क : ८९५६३४४४७२

मोडी लिपी ऑनलाइन कार्यशाळा
छत्रपती शिवाजी महाराजांची राजलिपी मोडी ही महाराष्ट्राची समृद्ध लिपी आहे. इतिहासातील अनेक लिखित कागदपत्रांमध्ये बंद असलेला इतिहास वाचण्यासाठी तसेच मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी ही लिपी शिकणे हे महत्त्वाचे कार्य आहे. या पार्श्वभूमीवर येत्या रविवारपासून (ता. २६) मोडी लिपी अक्षर ओळख ऑनलाइन कार्यशाळा सुरु होणार आहे. यात मोडी लिपीचा इतिहास, मूलभूत ज्ञान, मोडी लिपी अक्षर ओळख तसेच ई-पुस्तकांसोबत लेखन व वाचन सरावाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे. ही कार्यशाळा कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकतात. मोडी लिपीमध्ये लिहिण्याची व वाचण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९१४६०३८०३१

रिअल इस्टेट गुंतवणूक व पैसा
पैसा कमविण्यासाठी गुंतवणूक पर्याय म्हणून रिअल इस्टेट क्षेत्राकडे कसे पाहावे, यातील धोके कोणते, काळजी काय घ्यावी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. २६) होणार आहे. यामध्ये सवलतीच्या प्रॉपर्टीज कशा शोधाव्या, रिअल इस्टेटमधील निवासी व व्यावसायिक मालमत्तांचे व्यवहार व गुंतवणूक कशी करावी, गुंतवणुकीचे पर्याय व परतावा, बाजार संशोधन व स्पर्धक विश्लेषण, ग्राहक शोधणे, वित्त व कर व्यवस्थापन, कमी भांडवलामध्ये सुरक्षित नफा कमविण्यासाठीचे पर्याय आदी विषयांवर रिअल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत नोट्स दिल्या जातील आणि १०० टक्के व्यावहारिक ज्ञान आणि वास्तविक उदाहरणांसह माहिती दिली जाईल.
संपर्क : ९३५६९७३४२७
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com