कोरेगाव पार्कमधील कोंडी 
सोडविण्यासाठी नागरिक सरसावले

कोरेगाव पार्कमधील कोंडी सोडविण्यासाठी नागरिक सरसावले

पुणे, ता. २९ ः साधू वासवानी पुलासाठी वाहतूक विभागाने कोरेगाव पार्क-बंडगार्डन परिसरात वाहतुकीचे मोठे बदल केले आहेत. यामुळे गेल्या शनिवारपासून या भागातील रहिवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत विविध सूचना करत उपाय सुचविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
बंडगार्डन-कोरेगाव पार्कमधील रहिवाशांना वाहतूक बदलांमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार मोहन जोशी यांनी नागरिकांसाठी बैठकीचे आयोजन केले होते. मोहल्ला कमिटी सदस्य धैर्यशील वंडेकर यांच्या प्रयत्नातून आयोजित या बैठकीत कोरेगाव पार्क, बोट क्लब, बंडगार्डन या विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली. तसेच याबाबत नागरिकांनी काही उपाय देखील सुचवले. बैठकीत नागरिकांनी केलेल्या सूचना व योजलेले उपाय यांची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
पुण्यातील रस्ता वाहतुकीच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागातून जोशी हे ‘वेक-अप पुणेकर’ हे अभियान चालवत आहेत. या बैठकीस धैर्यशील वंडेकर, डॉ. विद्या दामले, समीर रूपानी, भारती पाटील, साथी नैयर, डॉ. बोरगावकर, मनोज फुलपगार, अमृता चंदानी आणि मल्लिका साबुनानी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com