Pune News
Pune Newssakal

Pune News : वाहन योग्यता प्रमाणपत्र उशिरा घेणे ‘महागात’

वाहन योग्यता प्रमाणपत्र उशिरा घेणे आता चांगलेच महागात पडणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने परिवहन संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्राबाबत नवा नियम लागू केला आहे. योग्यता प्रमाणपत्रास उशीर झाल्यास वाहन चालकांना दिवसाला पन्नास रुपयांचा दंड आकारला जात आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसत आहे.

पुणे : वाहन योग्यता प्रमाणपत्र उशिरा घेणे आता चांगलेच महागात पडणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने परिवहन संवर्गातील वाहनांना योग्यता प्रमाणपत्राबाबत नवा नियम लागू केला आहे. योग्यता प्रमाणपत्रास उशीर झाल्यास वाहन चालकांना दिवसाला पन्नास रुपयांचा दंड आकारला जात आहे. याचा सर्वाधिक फटका रिक्षा चालकांना बसत आहे.
परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. खुल्या परवानामुळे आधीच रिक्षा व्यवसायात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात आता योग्यता प्रमाणपत्रासाठी विलंब शुल्क आकारले जात असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच राज्यातील लाखो परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र रखडण्याची आणि त्यामुळे वाहतूक धोकादायक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • - आरटीओचा पासिंग कोटा - दररोज १४० रिक्षा
    - फुलेनगर, दिवेघाट पासिंग होते, अन त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट (योग्यता प्रमाणपत्र) मिळते.
    - योग्यता प्रमाणपत्र फी ६०० रुपये आहे.
    - पासिंगसाठी इन्शुरन्स ३ हजार ५०० रुपयांपर्यंत काढावा लागतो.
    - गाडीची कामे इतर कामे करावी लागल्याने सुमारे ६ हजारांपर्यंत रिक्षाचालकांचा खर्च जातो.

रिक्षाचालकांच्या मागण्या...
- तूर्त केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी.
- सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी.
- आणि त्या मुदतीनंतर तंदुरुस्ती प्रमाणपत्र उशिरासाठी जाचक होणार नाही इतपत रक्कम आकारावी.

केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या आदेशात १५ वर्षांवरील वाहनास योग्यता प्रमाणपत्र नसल्यास रोज ५० रुपये दंड आकारण्यास सांगितले आहे. राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने काढलेला आदेश चुकीचा आहे. त्यामुळे राज्यातील लाखो रिक्षाचालकांवर आर्थिक ताण येत आहे. कॅबमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आलेला असताना, या दंडामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक मेटाकुटीस आला आहे.
- शफीक पटेल, आझाद रिक्षा संघटना

योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र संपलेले आहे. त्यादिवसापासून प्रतिदिन ५० रुपये अतिरिक्त फी दंडात्मक स्वरूपात घेण्याची तरतूद २०१६च्या केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार करण्यात आली आहे. त्या निर्णयाला माननीय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश होते. ते आदेश माननीय उच्च न्यायालयाने उठवले आहेत. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना उशीर झालेल्या प्रत्येक दिवसासाठी अतिरिक्त फी प्रतिदिन रुपये ५० लागू करण्यात आली आहे.
- संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (प्रभारी) पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com