‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण २० जूनपासून

‘एफपीसी सीईओ’ प्रशिक्षण २० जूनपासून

पुणे, ता. १ : सकाळ-अॅग्रोवनची प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंगच्या (एसआयआयएलसी) वतीने शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २५ जून २०२४ या कालावधीत हा प्रशिक्षण वर्ग पुण्यात होणार आहे.
एफपीसीची नोंदणी पूर्ण होताच, कंपनीला सीईओ (किंवा व्यवस्थापक) नियुक्त करणे आवश्यक असते. भारतात आजघडीला ४० हजारांहून अधिक एफपीसींची नोंदणी झालेली आहे. खुल्या बाजारात नवनव्या व्यवसाय संधी वाढू लागल्याने शेतकरीही एफपीसी संकल्पनेच्या माध्यमातून बाजारात आपली उत्पादने आणण्याचा कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफपीसी सीईओ’ या पदाची मागणी वाढत आहे.
संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, व्यवसाय नियोजन करणे, बाजार नियोजन करणे, मनुष्यबळ व्यवस्थापन करणे अशी जबाबदारी सीईओ पदावर असलेल्या व्यक्तीला सांभाळावी लागते. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थी निवडीवेळी शेतकरी कंपनीने तसे कुशल मनुष्यबळ नियुक्त केले आहे की नाही हे निकषही तपासले जातात. विविध परवाने प्राप्त करतानाही अशा निकषांची पडताळणी होत असते. यामुळे या पदावर कुशल उमेदवार नियुक्त करणे महत्त्वाचे ठरते.
कृषीसह विविध विद्याशाखांमधून पदवी शिक्षण पूर्ण केलेले पदवीधर, एफपीसीचे संचालक तसेच एफपीसी नोंदणी करू इच्छिणारे शेतकरी यांच्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी कंपनी नोंदणी प्रक्रिया व नोंदणीनंतरचे अनुपालन, कृषी व्यवसाय मूल्यसाखळी, शेतमाल पुरवठा साखळी व्यवस्थापन, भांडवल उभारणी व वित्त व्यवस्थापन, कर प्रणाली, व्यवसाय आराखडा स्वरूप, बुक किपिंगचे महत्त्व, शासकीय योजनांची ओळख, या क्षेत्रातील रोजगार संधींची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणात सहभागी उमेदवारांना उपलब्ध रोजगार संधींची माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षण वर्गासाठी ९९०० रुपये शुल्क असून, अधिक माहितीसाठी या 9307649047 किंवा 9359400997 क्रमांकावर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com