अल्पवयीन आरोपीकडून तपासात असहकार्य

अल्पवयीन आरोपीकडून तपासात असहकार्य

पुणे, ता. १ : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. परंतु, या वेळी अल्पवयीन आरोपीने पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याने तपासात सहकार्य केले नसल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

गुन्हे शाखेच्या पथकाने येरवडा येथील बाल न्याय मंडळासमोर शनिवारी (ता. १) अल्पवयीन आरोपीची सुमारे एक तास चौकशी केली. या वेळी त्याची आई शिवानी अग्रवाल आणि बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते. यावेळी आरोपी मुलाला पोलिसांनी काही प्रश्न विचारले. परंतु, त्यावर ‘आता नेमके आठवत नाही,’ अशी उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीची चौकशी करण्यासाठी बाल न्याय मंडळाची परवानगी घेतली होती. चौकशी करताना त्याचे पालक आणि बाल संरक्षण अधिकारी उपस्थित असणे आवश्यक असते. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांचे पथक मुलाची आई शिवानी अग्रवालला घेऊन बाल न्याय मंडळाच्या कार्यालयात पोहचले. मात्र, चौकशीत आरोपीला विचारलेल्या प्रश्नांवर त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पुन्हा चौकशी करणार
अल्पवयीन आरोपीने आज पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी बाल न्याय मंडळाकडे परवानगी घेण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना दिली.

पोलिसांनी हे विचारले प्रश्न -

अपघातावेळी मोटार कोण चालवीत होते?
अल्पवयीन मुलाकडून मिळालेले उत्तर - नेमके आठवत नाही.

कोझी आणि ब्लॅक पबमध्ये कोण कोण उपस्थित होते?
अल्पवयीन मुलाकडून मिळालेले उत्तर - लक्षात नाही.

ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घेतले, त्यावेळी कोण कोण उपस्थित होते?
अल्पवयीन मुलाकडून मिळालेले उत्तर - नेमके आठवत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com