किंमत देत नसल्याने 
तरुणाला बेदम मारहाण

किंमत देत नसल्याने तरुणाला बेदम मारहाण

पुणे, ता. १ : आमच्या प्रतिष्ठेला धोका पोचवतो, तसेच आम्हाला किंमत देत नाही या कारणावरून सरार्इत गुन्हेगारासह आठ जणांच्या टोळक्याने एकाला बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे काढून घेतले. हा प्रकार शुक्रवारी (ता. ३१) दुपारी दीडच्या सुमारास मंगळवार पेठेतील भरतरीनाथ मठात घडला.
या प्रकरणी सरार्इत गुन्हेगार यश प्रदीप जावळे (वय २२, रा. हडपसर), सूरज रमेश पंडित (वय २७, रा. सातवाडी), प्रतीक शिंदे, गणेश ऊर्फ टमाटा व इतर चार जणांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ विजय कट्टीमनी (वय ३४, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ कट्टीमनी शुक्रवारी दुपारी भरतरीनाथ मठात आले होते. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. सौरभ हे आरोपींना नीट किंमत देत नाही. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धोका पोचवत असल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून महंमदवाडी स्मशानभूमी जवळील मैदानावर नेले. त्यानंतर देसाई हॉस्पिटल जवळच्या मैदानात बोलावून घेत त्यांना लाथाबुक्क्यांनी, केबल, कमरेच्या पट्ट्याने व दगडाने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांच्या खिशातील पाच ते सहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com