अकरा वाहन विक्रेत्यांचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द होणार?

अकरा वाहन विक्रेत्यांचे ट्रेड सर्टिफिकेट रद्द होणार?

पुणे, ता. १ : पुणे आरटीओ प्रशासनाच्या वायुवेग पथकाने १० दिवसात नोंदणी नसलेल्या ११ दुचाकींवर कारवाई केली आहे. यात संबंधित ११ वाहन विक्रेत्यांना तुमचे ट्रेड सर्टिफिकेट (वाहन विक्री परवाना) का रद्द करू नये, अशी नोटीस बजावली आहे. आरटीओची कारवाई केवळ नोटीस पुरती मर्यादित राहता कामा नये, अन्यथा शहरात विना नोंदणी केलेल्या वाहनांचा ‘प्रवास’ सुसाटच सुरू राहील.

कल्याणीनगर रस्ते अपघातानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणी मोहीम सुरू केली. २२ ते ३१ मे दरम्यान चाललेल्या या मोहिमेत सुमारे १० वायुवेग पथकाला विना नोंदणी केलेली ११ दुचाकी आढळून आली. तर, दोन अल्पवयीन मुले गाडी चालविताना आढळले. तर ५२ जण मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळले आहेत. अशा ५२ जणांचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला जाणार असून त्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.

कल्याणीनगर अपघातात अल्पवयीन मुलाने चालविलेली पोर्श या कारची नोंदणी केलेली नव्हती. ती बंगळूर येथील वाहन विक्रेत्यांकडून तात्पुरती नोंदणी करून आणण्यात आली होती. पण, ती रस्त्यावर आणण्यास परवानगी नव्हती. तरीही ती रस्त्यावर आणून तिने अपघात केला. त्यानंतर पुणे आरटीओने शहरात विना नोंदणी रस्त्यावर आलेल्या वाहनांची शोध मोहीम सुरू केली. विना नोंदणी वाहनांवर कारवाई करताना संबंधित वाहन विक्रेत्यांना देखील कारवाईची नोटीस दिली आहे. मात्र यात पुणे शहरातील एकाही वाहन विक्रेत्यांचा समावेश नाही. पुणे जिल्ह्यातील वाहन विक्रेत्यांकडून दुचाकी घेऊन पुणे शहरात धावत असल्याचे निदर्शनास आले आहे.

दोन अल्पवयीन दुचाकीचालकांना पकडले
पुणे आरटीओच्या वायुवेग पथकाने शहराच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या तपासणीमध्ये दोन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना आढळून आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

११ वाहन विक्रेत्यांना ट्रेड सर्टिफिकेट का रद्द करू नये, अशी नोटीस दिली आहे. तसेच ५२ मद्यपी चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला जाईल.
संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com