शाश्वत तंत्रज्ञान निर्मितीचे
आजच्या युवकांसमोर आव्हान

शाश्वत तंत्रज्ञान निर्मितीचे आजच्या युवकांसमोर आव्हान

पुणे, ता. २ ः स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशाच्या निर्मितीत आजच्या युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण त्यांना भारताचा विकास केवळ ‘तंत्रज्ञान हब’ म्हणून करायचा नाही, तर त्याला शाश्वततेची जोडही द्यावी लागणार आहे. आजच्या युवकांसमोर हेच आव्हान आहे, असे प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य डॉ. विजय कुमार सारस्वत यांनी व्यक्त केले.
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर पुणे) ११ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या समारंभात ३४६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी आयसरचे संचालक प्रा. सुनील भागवत यांनी वार्षिक अहवाल सादर केला.
बी. एस. - एम.एस. अभ्यासक्रमाचा विद्यार्थी वरुण कौशल शहा याने यंदाचे सुवर्णपदक पटकाविले. हिमानी खुराना (जीवशास्त्र), पूजा सिंधू (रसायनशास्त्र) आणि मितेश मोडासिया (गणित) यांना सर्वोत्कृष्ट पीएच. डी. प्रबंधासाठी सन्मानित करण्यात आले. बी.एस. - एम. एस.चे विद्यार्थी श्वेता गर्ग (जीवशास्त्र), ऋत्विक हलदर (रसायनशास्त्र), गरवित ए. (डेटा सायन्स), देवयानी जांभुळे (पृथ्वी आणि हवामान विज्ञान), वरुण (मानवता आणि सामाजिक विज्ञान); वरुण कौशल शहा (गणित) आणि वेदांत एसव्हीयू (भौतिकशास्त्र) यांनी सर्वोत्कृष्ट एम. एस. प्रबंधासाठी पुरस्कार संपादन केले.
---
आयसरची वाटचाल
- एकूण पदवीप्राप्त विद्यार्थी ः ३४६
- पीएचडी ः ७२
- विज्ञानातील पदव्युत्तर पदवीसह पीएच. डी. प्राप्त करणारे विद्यार्थी ः २८
- एकात्मिक पीएच. डी.सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणारे ः ९
- बी. एस. - एम. एस. पदवी प्राप्त करणारे ः १९५
- बॅचलर इन सायन्स (बी. एस.) ः १५
- मास्टर इन सायन्स (एम. एस.) ः २७
-------------
फोटो ः U23560
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com