अधिकारी होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा : बर्गे

अधिकारी होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा : बर्गे

पुणे, ता. ३ : ‘‘अधिकारी होण्यासाठी धडपडणारी मुले प्रतिकूल परिस्थितीतून आलेली असतात. ती संकटांशी दोन हात करतात. कारण लढणे आणि झुंजणे त्यांचा स्थायीभाव असतो; पण ती जिद्द आणि चिकाटी कायम बाळगली तर यश हमखास मिळते. म्हणून तरुणांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे,’’ असे मत माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.
श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि स्पार्क ॲकॅडमी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ॲकॅडमीच्या द्विवार्षिक कामगिरीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. विवेक स्पार्क फाउंडेशनचे कार्यवाह महेश पोहनेरकर, श्रीराम मंदिर ट्रस्टचे शरद सारडा, शैक्षणिक संचालक स्वागत दरख आदी उपस्थित होते. पोहनेरकर म्हणाले, ‘‘आर्थिकदृष्ट्या मागास, गरजू व होतकरू युवकांना स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करता यावा. त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासून दोन वर्षांपूर्वी ही ॲकॅडमी सुरू केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ५१ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यातील काहीजण उपजिल्हाधिकारी, उपअधिक्षक, उपनिबंधक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदांवर पोहोचले आहेत.’’ धनंजय झोंबाडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक स्वागत दरख यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com