वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

पुणे, ता. ४ : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर असलेल्या गोव्यात दाखल झाले असतानाच महाराष्ट्रावर बुधवारी (ता. ५) वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी व्यक्त केला. त्यासाठी महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार हे जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात वेगाने घट होऊ लागली आहे. विदर्भ वगळता बहुतांश महाराष्ट्रात कमाल तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. राज्यात मंगळवारी जळगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले.
राज्यात सापेक्ष आर्द्रता वाढत असून, पश्चिमेकडील वाऱ्यांचे प्रवाह प्रभावामुळे मॉन्सूनच्या आगमनास पोषक हवामान होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बुधवारी (ता. ५) वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) : पुणे ३६.६, जळगाव ४१.४, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्वर २७.६, मालेगाव ४१.२, नाशिक ३६.७, सांगली ३५.९, सातारा ३६.६, सोलापूर ३९.२, सांताक्रूझ ३५.६, डहाणू ३७.५, रत्नागिरी ३४.२, छत्रपती संभाजीनगर ३८, बीड ३७.७, नांदेड ३८.२, धाराशिव ३७.४, परभणी ३९.३, अकोला ४०.८, अमरावती ३९.९, बुलडाणा ३६.२, ब्रह्मपुरी ४०.४, चंद्रपूर ४०.८, गोंदिया ४०.६, नागपूर ३९.२, वर्धा ४०, वाशीम ३६.४, यवतमाळ ४०.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलडाणा, परभणी, हिंगोली
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com