रेल्वेतून जाणाऱ्या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग

रेल्वेतून जाणाऱ्या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग

पुणे, ता. ५ ः पुण्याहून रेल्वेद्वारे वाहतूक होणाऱ्या प्रत्येक पार्सलचे स्कॅनिंग होणार आहे. पुणे स्थानकावरील पार्सल कार्यालयात सुमारे २५ लाख रुपयांचे स्कॅनिंग मशिन बसविण्यात आले आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे मशिन रेल्वे प्रशासनाने नाही तर स्थानकावर काम करणाऱ्या हुंडेकऱ्यांनी वर्गणीतून गोळा केलेल्या रकमेतून घेतले आहे. पुणे स्थानकावरच नाही तर देशात पहिल्यांदाच एखाद्या स्थानकावर वर्गणीतून अशा प्रकारे स्कॅनिंग मशिन बसविल्याचा दावा पुणे रेल्वे प्रशासनाने केला आहे. दोन सेकंदात एक पार्सल स्कॅन करण्याची या मशिनची क्षमता आहे.
पुणे स्थानकावरून मोठ्या प्रमाणात पार्सलची वाहतूक होते. दररोज पुणे स्थानकावरून सुमारे पाच हजार पार्सलची वाहतूक होते. गेल्या काही वर्षांत देशातील विविध स्थानकावर पार्सलच्या माध्यमातून मोठे गैरप्रकार घडले आहे. पार्सलमधून कधी तलवारीची वाहतूक झाली आहे, तर कधी छुप्या पद्धतीने गुटख्याची वाहतूक झाली आहे. तर दोन वर्षांपूर्वी सिकंदराबादहून दरभंगाला येणाऱ्या रेल्वेच्या पार्सल व्हॅनमध्ये बॉम्ब पाठविण्यात आला होता. त्यामुळे २०२२ मध्ये दरभंगा स्थानकावर बॉम्बस्फोट देखील झाला होता. अशा प्रकारामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक देखील असुरक्षित बनली होती. मात्र आता पुणे स्थानकावर अत्याधुनिक स्कॅनिंग मशिन बसविल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व पार्सलची तपासणी होणे सहज शक्य झाले आहे. मंगळवारी स्कॅनिंग मशिनचे उद्‍घाटन पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा आदी उपस्थित होते.

प्रवाशांचा खर्च वाचला
- सामान्यपणे रेल्वे प्रशासन निविदा काढून पार्सल कार्यालयात स्कॅनिंग मशिन बसवितात
- मक्तेदार पार्सलच्या स्कॅनिंगसाठी शुल्क आकारतो
- ज्या ग्राहकांना पार्सल पाठवायचे आहे, त्यांच्याकडून स्कॅनिंग शुल्क आकारले जाते
- पुणे स्थानकावर मात्र हुंडेकऱ्यांनी स्वतः या मशिनचा खर्च केल्याने प्रवाशांना आता शुल्क द्यावे लागणार नाही

पुणे स्थानकावरील पार्सल कार्यालयात पार्सल स्कॅनर मशिन बसविण्यात आले आहे. हुंडेकरी असोसिएशनने स्वखर्चातून हे मशिन बसविले आहे. मंगळवारपासून त्याचा वापर सुरू झालेला आहे.
- मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com