लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
Loksabha Election News :

Political News : लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही|

Pune News: लोकसभा निवडणुकीच्या निकालाने विद्यमान आमदारांची चिंता आणि धाकधूक वाढली आहे. अहमदनगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील ३० आमदारांपैकी १४ आमदारांना मतदारांनी धोक्याचा इशारा दिला आहे. यात सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची संख्या जास्त आहे.

नगर, शिर्डी, माढा आणि सोलापूर या चार जागा विरोधकांनी खेचून भाजप महायुतीला ‘जोर का झटका’ दिला. तर भाजपला साताऱ्याची एक जागा मोठ्या संघर्षानंतर स्वतः कडे आणता आली. या तीन जिल्ह्यांच्या पाचही लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या. मात्र आमदारांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

३० विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त फोटोंपुरते प्रचारात उतरलेले आमदार कोण? याचीही आता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसच्या वतीने चाचणी सुरू झाली आहे.

लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
Lok Sabha Election Result 2024 : मविआ-महायुतीच्या मतांत किरकोळ फरक

माढ्यातील पराभव जिव्हारी


माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या मतदारसंघातील सहाही आमदार कागदोपत्री भाजप महायुतीचे असले तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख २० हजारांचे मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला. या मतदारसंघातील संजयमामा शिंदे (करमाळा), बबनदादा शिंदे (माढा), राम सातपुते (माळशिरस)

या आमदारांच्या मतदारसंघात मोहिते पाटील यांनी मोठे मताधिक्य मिळविले. फलटणमध्ये आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोधात प्रचार केला. पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी येथे १६ हजारांचे मताधिक्य घेतले. जयकुमार गोरे आणि शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळाले.


मतदारसंघात एक हजारांचेच लीड


सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी जे मताधिक्य मिळवले, त्यामुळेच त्यांना विजय मिळवता आला. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे यशवंत माने तर पंढरपूरमध्ये भाजपचे समाधान आवताडे हे आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला मिळालेले मताधिक्य हे या दोघांच्या अडचणी वाढवणारे आहे.

सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातही शिंदे यांनी मताधिक्य मिळवले आहे. या तुलनेत सचिन कल्याणशेट्टी आणि विजय देशमुख यांच्या मतदारसंघाने राम सातपुते यांना चांगली साथ दिली. शिंदे यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात केवळ एक हजार मतांचेच लीड मिळवता आले, हेही चिंता वाढविणारे आहे.

लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
Political Explainer: स्मृती ईराणींचा पराभव करणारे किशोरीलाल शर्मा आहेत तरी कोण?


दोन मतदारसंघांनी तारले


साताऱ्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही डोळ्यात अंजन घालणारा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वाईतील आमदार मकरंद पाटील, कराड उत्तरमधील बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या मतदारसंघातून आपल्या उमेदवारांना मताधिक्य देता आले नाही.

कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्या मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यावरच उदयनराजे यांचा विजय शक्य झाला.

लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
Belgaum Politics : चार आमदार अन् एक खासदार; बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी घराण्याचा दबदबा कायम

स्थानिक आमदारांवर गणित


अहमदनगरमध्ये बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा मतदारसंघात नीलेश लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. तर प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांनी मताधिक्य मिळवले. या दोन्ही मतदारसंघात विरोधकांना मिळालेले मताधिक्य विधानसभा
निवडणुकीत परिणाम करणारे आहे. रोहित पवार, संग्राम जगताप, नीलेश लंके, मोनिका राजळे यांच्या मतदारसंघांमध्ये मात्र त्या-त्या पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे.

लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?


संगमनेर, अकोलेचा हात


शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली होती. थोरात यांनी संगमनेर आणि डॉ. किरण लहामटे यांच्या अकोलेमधून मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय शक्य झाला. मात्र श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि नेवासेचे आमदार शंकरराव गडाख यांना त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मताधिक्य देता आले नाही.

लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
National Politics : राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक नेत्यांचे महत्त्व वाढले
रेड अलर्ट असलेले विधानसभा मतदारसंघ


- माढा : करमाळा, माढा, माळशिरस
- सोलापूर : मोहोळ, सोलापूर दक्षिण, पंढरपूर
- सातारा : वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण
- शिर्डी : श्रीरामपूर, नेवासा
- नगर : श्रीगोंदा, राहुरी

लोकसभेचा विधानसभेवर होणार परिणाम? १४ आमदारांसाठी धोक्याची घंटा
Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com