रामवाडीत गॅस गळतीमुळे
फीडर पिलरला आग

रामवाडीत गॅस गळतीमुळे फीडर पिलरला आग

पुणे, ता. ५ : रामवाडी येथील बिशप शाळेजवळील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) पाइपलाइनच्या गॅस गळतीमुळे जवळच असलेल्या महावितरणच्या उच्चदाबाच्या फिडर पिलरला बुधवारी (ता. ५) सकाळी ११ च्या सुमारास आग लागली. त्यामुळे सुमारे ३५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुमारे ४५ मिनिटे बंद होता.
कल्याणीनगर परिसरातील बिशप शाळेजवळ महावितरणचा उच्चदाबाचा फिडर पिलर आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास अतिरिक्त पर्यायी व्यवस्था म्हणून हा फिडर पिलर लावण्यात आला आहे. त्याजवळच एमएनजीएलची पाइपलाइन आहे. मात्र, बुधवारी सकाळच्या सुमारास एमएनजीएलच्या पाइपलाईनमधून गॅस गळती होऊन आग लागली. ही आग फिडर पिलरपर्यंत पोहचल्याने त्यानेही पेट घेतला. त्यामुळे उपकेंद्रातील वीजवाहिनी ट्रीप होऊन वीजपुरवठा खंडित झाला.
याबाबत माहिती कळताच महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री केली. तसेच फिडर पिलरच्या भूमिगत वाहिन्या वेगळ्या केल्या. त्यानंतर बंद पडलेली उपकेंद्रातील वीजवाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, यात सुमारे ३५०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४५ मिनिटे बंद राहिला. याप्रकरणी महावितरणकडून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com