पोलिस कोठडीतील अस्वच्छतेमुळे त्रास

पोलिस कोठडीतील अस्वच्छतेमुळे त्रास

पुणे, ता. ५ : रक्तनमुने बदलल्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या शिवानी अग्रवाल हिने कोठडीत अस्वच्छतेमुळे त्रास होत आहे, अशी तक्रार बुधवारी न्यायालयात केली. शिवानीला फरासखाना पोलिस ठाण्याच्या आवारातील कोठडीत ठेवले आहे.
कोठडीतील अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याची तक्रार शिवानीने न्यायालयात केली. न्यायालयाने तिच्या तक्रारीची दखल घेतली. वकिलांमार्फत तक्रार नोंदवावी, असा आदेश न्यायालयाने दिला. याच गुन्ह्यात ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबर्इने दोघांना कारणे दाखवा नोटीस पाठवून सात दिवसांच्या आत म्हणणे मांडायला सांगितले आहे. हाळनोर याच्यावतीने बाजू मांडतांना ॲड. हृषिकेश गानू यांनी न्यायालयात सांगितले, की हाळनोर यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची कारणे दाखवा नोटीस मंगळवारी मिळाली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी हाळनोर यांना कागदपत्रांची गरज असून ही कागदपत्रे बी. जे. मेडिकल येथील खोलीत आहेत. ही खोली सील केली आहे. तसेच मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यातील कागदपत्रे मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले, की बी. जे. मेडिकल येथील हाळनोर याची खोली पोलिसांनी नाही; तर ससून प्रशासनाने सील केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com