सायबर चोरट्यांकडून तिघांची २२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून तिघांची २२ लाखांची फसवणूक

पुणे, ता. ६ : ऑनलार्इन टास्क, गुंतवणुकीच्या आमिषाने चांगला परतावा देण्याच्या आमिषाने आणि बँकेतून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी शहरातील तिघांची २२ लाख १५ हजार ७८९ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर फरासखाना, सिंहगड, चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टास्कच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक
टास्क पूर्ण केल्यास चांगले कमिशन देण्याच्या आमिषाने वडगाव येथील एकाची तीन लाख ४१ हजार ६६५ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी प्रशांत चंपकराज पाटकर (वय ५५, रा. सिंहगड रस्ता, वडगाव) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्याने टेलिग्रामच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यात तीन लाख ४१ हजार ६६५ रुपये पाठवायला सांगून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक
चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची १५ लाख ८० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विकास ताराचंद गुगले (वय ६६ रा. घोले रस्ता, शिवाजीनगर) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ४ ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात घडली. सायबर चोरट्याने फिर्यादीला संपर्क करून चांगला परतावा मिळेल, असा विश्वास दाखवून १५ लाख ८० हजार रुपयांची गुंतवणूक करायला लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक
ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचे खोटे सांगून एकाची दोन लाख ९४ हजार १२४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नीलेश प्रकाश पांदविली (वय ३८, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १४ एप्रिल २०२४ रोजी घडली. सायबर चोरट्याने फिर्यादीशी संपर्क करून बंगलोर येथून ॲक्सिस बँकेतूचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून तुमचे बँक खाते बंद पडणार सांगितले. त्यानंतर एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून दोन लाख ९४ हजार १२४ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com