विवाहितेची आत्महत्या; आठ जणांवर गुन्हा

विवाहितेची आत्महत्या; आठ जणांवर गुन्हा

पुणे, ता. ६ : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना केसनंद गावाच्या हद्दीत घडली. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्या आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
किशोर पांडुरंग बडे, पांडुरंग भगवान बडे, आशा अशोक सांगळे, अशोक राजेंद्र सांगळे (रा. लोणी, बीड) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अश्विनी किशोर बडे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अश्विनी यांचा भाऊ शिवप्रसाद विठ्ठल सांगळे (रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. जुलै २०२१ ते ३१ मे २०२४ दरम्यान केसनंद गावाच्या हद्दीत तसेच पवारवस्ती, मांजरी येथे हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी यांना आरोपींनी वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. सासरच्या व्यक्तीसह इतर नातेवाईकांकडून तिचा छळ करण्यात आला. सातत्याने त्रास देऊन अश्विनीला मेडिकलमधील कुठल्यातरी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक निरीक्षक विजया वंजारी या गुन्‍ह्याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com