अवतीभवती

अवतीभवती

हॅण्डलूम प्रदर्शनास
आजपासून प्रारंभ
पुणे, ता. ६ : छत्तीसगड राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हॅण्डलूम कपड्यांच्या प्रदर्शनास शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. गुरुवार (ता. १३) पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रासिक कोना सिल्क, टसर सिल्क साडी, सलवार सूट, ड्रेस मटेरिअल, कोसा जॅकेट, दुपट्टा कस्तो तसेच कॉटन कपडे, बेडशीट, ड्रेस मटेरिअल, शर्टिंग, टॉवेल अशा विविध कपड्यांचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण कुटीर उ‌द्योगाला चालना देणे, महिलांद्वारे उत्पादित वेगवेगळ्या कपड्यांचा प्रचार व प्रसार करणे, नागरिकांपर्यंत हॅण्डलूम कपडे पोहोचवणे हा या प्रदर्शनामागचा उद्देश असल्याचे छत्तीसगड हॅण्डलूमचे उप संचालक एम. एम. जोशी यांनी सांगितले.
---------------
वनौषधी, पर्यावरण विषयक
पुस्तकांचे ‘मनसे’तर्फे वाटप
पुणे, ता. ६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २ हजार ५०० वनौषधी रोपांचे व पुस्तकांचे नागरिक, विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राजेंद्र वागसकर, गणेश सातपुते, योगेश खैरे, सुशीला नेटके, प्रल्हाद गवळी, आशिष देवधर, गणेश भोकरे, रवी सहाणे, आशुतोष माने, शशांक अमराळे, जयश्री पाथरकर उपस्थित होते. यंदा उपक्रमाचे १५ वे वर्ष आहे.
-------------
‘पर्यावरण मित्र’
पुरस्कार प्रदान
पुणे, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या पा. सा. तांबे, दीपक शिंदे, जयंत रणधीर, संजय काळोखे, मदनलाल दर्डा यांना ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्वती परिसरातील मित्र मंडळ चौकात झालेल्या कार्यक्रमामध्ये पर्यावरण शिल्पाचे पूजन करण्यात आले तर पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प करण्यात आला. यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे, पंडित रमेश रावेलकर, माणिकचंद बाहेती, वासुदेव केंच, प्रतिमा खांडेकर, शिल्पा खंडागळे, रमेश फडके, रमेश आबादे, डॉ. राजेंद्र भवाळकर उपस्थित होते.
-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com