छंदश्री दिवाळी अंक स्पर्धेचे 
पारितोषिक वितरण लवकरच

छंदश्री दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण लवकरच

पुणे, ता. ६ : कमलाबाई रसिकलाल धारिवाल छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पुढील शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी कवी अरुण म्हात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. या वेळी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचे पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आदींचे वितरण होणार आहे. उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या सहकार्यातून आठ वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com