आरटीओ अधिकाऱ्यांना अखेर पदोन्नती

आरटीओ अधिकाऱ्यांना अखेर पदोन्नती

पुणे, ता. ६ ः गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची पदोन्नतीचे आदेश गुरुवारी निघाले. राज्यातील २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. यात पुणे आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पदोन्नती झाली असून त्यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदावर झाली आहे. भोर यांच्या जागी जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या नियुक्तीची चर्चा होती. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघालेला नाही.
राज्याच्या परिवहन विभागाची पदोन्नतीची प्रक्रिया सातत्याने रखडली होती. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत राज्यातील चार प्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त झाले. यात पुण्याचे अजित शिंदे यांचा देखील समावेश होता. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर परिवहन आयुक्त कार्यालयात पदोन्नतीच्या प्रक्रियेला वेग आला होता. अखेर गुरुवारी पदोन्नतीचे आदेश निघाले. यात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांची मोटार वाहन निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली. तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांना व निरीक्षकांना शुक्रवारी कार्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले आहे.

कोण अधिकारी कोठे?
- पुणे आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक या पदावर नितीन पारखे व श्वेता कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे
- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांची नियुक्ती
- सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनुपमा पुजारी हे सातारा कार्यालयात मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्ती
- सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांची परिवहन कार्यालयात (मुंबई) नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com