घटस्फोटाचा दावा
तीन तारखांत निकाली

घटस्फोटाचा दावा तीन तारखांत निकाली

पुणे, ता. १ : कौटुंबिक वादातून सोबत राहण्याची इच्छा नसलेल्या प्रकरणात संमतीने दाखल केलेला घटस्फोटाचा दावा तीन तारखांत निकाली काढण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य तसेच परिणामांबाबत पक्षकारांशी चर्चा करून समेट घडवून हा दावा मिटला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशा आणि अक्षय (दोघांची नावे बदललेली) असे घटस्फोट झालेल्या जोडप्याचे नाव आहे. दोघांचाही हा दुसरा विवाह होता. त्यांना दोन मुले आहेत. कौटुंबिक वाद आणि स्वभाव भिन्नतेमुळे त्या दोघांना एकत्र राहणे शक्य नव्हते. त्यामुळे अक्षय याने आशाविरुद्ध रायगड येथे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्या प्रकरणात आशा या वकिलांमार्फत हजर झाल्या होत्या. तर आशा यांनी अक्षय यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. या दोन्ही प्रकरणात अक्षय यांच्यातर्फे अॅड. राजेंद्र कदम यांनी बाजू मांडली. आशा यांच्यावतीने अॅड. राणी कांबळे सोनवणे यांनी युक्तिवाद केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com