‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ला भरघोस प्रतिसाद

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’ला भरघोस प्रतिसाद

पुणे, ता. ७ : भविष्यात कोणत्या क्षेत्रात चांगले करिअर आहे? त्यासाठी आज कोणता अभ्यासक्रम योग्य असेल? प्रवेश कुठे घ्यावा? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना शुक्रवारी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’ या प्रदर्शनाचे. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
रविवारपर्यंत (ता.९) चालणाऱ्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डीईएस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई उपस्थित होते. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’चे निकमार युनिव्हर्सिटी हे ‘पॉवर्ड बाय स्पॉन्सर’ आहेत. तर भारती विद्यापीठ, डीईएस पुणे विद्यापीठ, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे ‘असोसिएट स्पॉन्सर’ आहेत. तसेच मराठवाडा मित्र मंडळ आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे ‘को-स्पॉन्सर्स’ आहेत. राज्यातील जवळपास ३५ हून अधिक नामांकित शिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती प्रदर्शनात विद्यार्थी-पालकांना घेता येणार आहे.

प्रदर्शनाबाबत
‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२४’
- कधी : ७, ८, ९ जून २०२४
- केव्हा : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत
- कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

या चर्चासत्रांमध्ये व्हा सहभागी :
भविष्यात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांमध्ये करा करिअर : डॉ. प्रशांत दवे (कुलसचिव, निकमार युनिव्हर्सिटी) : ८ जून २०२४ : सकाळी ११ः३० वाजता
दहावी-बारावीनंतरचे प्रवेशद्वार : डॉ. प्रतिक्षा वाबळे (अधिष्ठाता-शैक्षणिक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स) : ८ जून २०२४ : दुपारी १२ः४५ वाजता
अभियांत्रिकीचे प्रवेशद्वार : डॉ. रूपेश भोरटक्के (प्राचार्य, एमएमआयटी, मराठवाडा मित्र मंडळ) : ८ जून २०२४ : दुपारी ४ः१५ वाजता
कौशल्य शिक्षणातील करिअरच्या संधी : सुधाकर शिंदे (कुलसचिव, सिंबायोसिस स्किल्स ॲन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी) : ९ जून २०२४ : सकाळी ११ः ३० वाजता
दहावीनंतरच्या करिअर संधी : प्रा. भावना नरसिंगगोजू (प्राचार्य, सिंबायोसिस कनिष्ठ महाविद्यालय) : ९ जून २०२४ : दुपारी १२ वाजता

नवीन शैक्षणिक धोरण हा सकारात्मक बदल असून, तो समजून घेताना शिक्षण तज्ज्ञांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना अनेक दिवस जातील. विद्यार्थ्यांना या टप्प्यावर करिअरबद्दल अनेक प्रश्न असतात. त्याची उत्तरे देण्यासाठी सकाळ विद्या एक्स्पोचा प्लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण ठरत आहे.
- डॉ. प्रसाद खांडेकर, कुलगुरू, डीईएस पुणे विद्यापीठ

सकाळ माध्यम समूह शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना मदत करण्यामध्ये अग्रेसर राहिला आहे. या प्रदर्शनात राज्यातील विविध खासगी विद्यापीठांसह कौशल्याभिमुख शिक्षण देणाऱ्या ॲकॅडमीही सहभागी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व माहिती मिळणार आहे.
- डॉ. एम.आर.चिटणीस, कुलगुरू, एमआयटी डब्ल्यूपीयू विद्यापीठ

उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये सकाळ माध्यम समूह महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. स्वायत्त महाविद्यालयांनंतर आता विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांत एनईपीची अंमलबजावणी सुरू होत आहे. या दृष्टीने ‘सकाळ’ही जागृती करत असून, अशा एक्स्पोच्या माध्यमातून त्याला गती मिळत आहे.
- डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण

विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व शैक्षणिक माहिती उपलब्ध झाली आहे. पुढील प्रवेशाच्या दृष्टीने हा एक्स्पो नक्कीच उपयोगी ठरत असून, जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी याचा लाभ घ्यावा.
- डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी चिंचवड
एज्युकेशनल ट्रस्ट

फोटो ः 24523, २४५२४, २४५२६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com