पुण्यात शनिवार, रविवारी 
ढगांच्या गडगडाटासह पाऊस

पुण्यात शनिवार, रविवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस

पुणे, ता. ७ : पुणेकरांनो येत्या शनिवार (ता. ८) आणि रविवार (ता. ९) या दोन्ही दिवशी शहर आणि परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली आहे. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने वर्षा सहलीचे नियोजन करताना हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याचा नक्की विचार करा. मॉन्सून पुणे जिल्ह्याच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील हवामानात वेगाने बदल होत आहेत. उन्हाचा चटका कमी होऊन पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत. येत्या तीन दिवसांत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
उन्हाच्या चटक्याने होरपळलेल्या पुणेकरांची पावले पाऊस पडल्याने वर्षा सहलींकडे वळतात. त्यामुळे पुढील तीन दिवसांत येणाऱ्या शनिवार आणि रविवारी पावसाची शक्यता आहे. या वेळी विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे झाडांखाली थांबू नका, असे आवाहन खात्याने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com