Pune Weather
Pune Weathersakal

Pune Weather : पुण्यात तीन वर्षांनंतर सलग ३९ अंश सेल्सिअस तापमान

पुण्यात तीन वर्षांनंतर कमाल तापमानाचा पारा सलग चार दिवस ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत गुरुवारी ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे : पुण्यात तीन वर्षांनंतर कमाल तापमानाचा पारा सलग चार दिवस ३९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. शिवाजीनगर येथील वेधशाळेत गुरुवारी ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाजही हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला.

पुण्यात २०२० मध्ये १७ ते २० एप्रिल या सलग चार दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा ३९ पेक्षा जास्त अंश सेल्सिअस नोंदला होता. आता तीन वर्षांनंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान पुन्हा सलग चार दिवस कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून आकाश अंशतः ढगाळ आहे. त्यामुळे उन्हाचा चटका काहीअंशी कमी झाला, मात्र त्यामुळे उकाडा वाढला. त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ झाल्याने सोमवारपासून (ता. १) कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअसवरून ३९.१ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. उन्हाचा चटका कायम असल्याने शहरात दुपारी प्रमुख रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. कामानिमित्त बाहेर पडणारे दुचाकीस्वार गॉगल, टोपी, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसते.

आता येत्या शुक्रवारपासून (ता. ५) पुढील तीन दिवस दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होईल. या दरम्यान कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले जाईल. पुणे शहर आणि परिसरात येत्या मंगळवारपासून (ता. ९) पावसाच्या तुरळक सरी पडण्याची शक्यता आहे.
पुणे परिसरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

  • शिरूर .- ४१.६
    कोरेगाव पार्क - ४०.४
    मगरपट्टा - ४०.४
    एनडीए, वडगाव शेरी ...... ३९.९
    हडपसर ............... ३९.७
    पाषाण ........... ३९.१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com