सिंबायोसिसच्या लवळे येथील रुग्णालयात
उभारला डायलिसिस प्रकल्प

सिंबायोसिसच्या लवळे येथील रुग्णालयात उभारला डायलिसिस प्रकल्प

पुणे, ता. ३० : ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’च्या साह्याने रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षा स्टेफनी आर्चिक यांच्या हस्ते सिंबायोसिसच्या लवळे येथील रुग्णालयात उभारण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरला उच्च प्रतीच्या आणखी सहा नव्या मशिन्स देण्यात आल्या. हा रोटरी डायलिसिस प्रकल्प १ कोटी २० लाख रुपयांच्या २६ डायलिसिस मशीनसह कार्यरत झाला आहे. या सेंटरद्वारे दरमहा दोन हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार होऊ शकतील. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वत्रिक आरोग्य योजनेअंतर्गत वंचितांना फायदा होईल. सिंबायोसिसच्या या सेंटरला रोटरीने या पूर्वी ११ मशिन्स गेल्या वर्षी दिल्या आहेत. त्यामुळे या सेंटरला ‘रोटरी योडा डायलिसिस सेंटर’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पुणे शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो गरजू रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार रोटरी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या कार्यक्रमासाठी रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षा स्टेफनी आर्चिक आणि रोटरी इंटरनॅशनलचे माजी डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी तसेच रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर राजू सुब्रमण्यम, रोटरी मुंबईचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संदीप अगरवाला, मुंबई रोटरी क्लबचे अध्यक्ष मनोज पटोडिया, स्वाती जयडिया, रमेश रोडे आणि रोटरी स्पोर्ट्स सिटीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. कोटबागी यांचा पुढाकार व पुणे रोटरी स्पोर्ट्स सिटीचे संदेश सावंत यांनी विशेष सहकार्य केले. या प्रसंगी सिंबायोसिस खासगी विद्यापीठाच्या प्रो-व्हाईस चॅन्सेलर डॉ. स्वाती मुजुमदार आणि सिंबायोसिस विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या प्रसंगी रोटरी योडा हार्ट सेंटरच्या लोगोचे अनावरण रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षा स्टेफनी आर्चिक यांच्या हस्ते झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com