४० टक्के सवलतीसाठी आणखी एक संधी शक्य

४० टक्के सवलतीसाठी आणखी एक संधी शक्य

पुणे, ता. २ ः मिळकतकरातील ४० टक्के सवलतीपासून अनेक नागरिक वंचित आहेत, अशा नागरिकांकडून ‘पीटी ३’ हा अर्ज भरून घेऊन त्यांना चालू आर्थिक वर्षापासून सवलत लागू करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे मान्यतेसाठी आहे. हा निर्णय झाल्यास सुमारे दीड लाख मिळकतधारकांना एका महिन्याची मुदत मिळणार आहे.

नेमके काय झाले?
- पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता
- पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवले आहेत अशा ९७ हजार मिळकतींचा समावेश करण्यात आला
- त्यांना २०१९ ते २०२२ या तीन वर्गातली ४० टक्के सवलतीची रक्कम फरकासह भरण्याचा आदेश देण्यात आला
- २०१९ पासून नव्याने नोंदणी होणाऱ्या मिळकतींची सवलत काढून घेण्यात आली
- त्यामुळे अवाच्या सवा बिल आल्याने नागरिकांनी प्रचंड तक्रारी केल्या
- त्यानंतर राज्य सरकारने ही सवलत पुन्हा देण्याचा निर्णय घेतला

अशी आहे स्थिती
- या संदर्भात नुकतीच एक बैठक अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे झाली
- त्यामध्ये ४० टक्के सवलतीचा आढावा घेण्यात आला
- शहरातील सुमारे दोन लाख ६४ हजार मिळकतींना ४० टक्के सवलत देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यापैकी सुमारे एक लाख नागरिकांनी ‘पीटी ३’ अर्ज भरलेला आहे
- आणखी एक लाख ६४ हजार जणांकडून अर्ज भरणे अपेक्षित
- त्यामुळे या नागिरकांना दिलासा देता यावा यासाठी प्रशासनातर्फे आणखी एकदा ‘पीटी ३’ अर्ज भरण्यासाठी मुदत देण्याचा प्रस्‍ताव विचाराधीन
- या संदर्भातील प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला
- आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर एका महिन्याची मुदत दिली जाणार
.................

अपेक्षित प्रतिसाद नाही
ही सवलत मिळण्यासाठी नागरिकांना ते स्वतः राहात असलेल्या सदनिकेचे पुरावे व ‘पीटी ३’ अर्ज भरून जवळच्या क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षकांकडे २५ रुपये शुल्क भरून जमा करण्यास सांगण्यात आले. यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com