विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा

विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन साजरा

पुणे, ता. २ ः महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली.
कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त संचलनाची पाहणी केली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये (आझम कॅम्पस)सकाळी नऊ वाजता ध्वजवंदन झाले. संस्थेचे अध्यक्ष कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वज पडकविण्यात आला. संस्थेचे सचिव इरफान शेख, डॉ. एन. वाय. काझी, डॉ. नाझिम शेख, मशकुर शेख आदी उपस्थित होते.

ई-श्रमकार्डचे वाटप
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेनाप्रणीत शिव कामगार सेनेच्यावतीने बांधकाम कामगारांना ई श्रम कार्ड आणि आयुष्मान भारत कार्डचे वाटप केले. सारसबाग येथील शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यक्रमास शिव कामगार सेनेचे अध्यक्ष सुधीर कुरुमकर, कार्याध्यक्ष सोपान भोसले, उपाध्यक्ष अर्जुन मोरे, उपाध्यक्ष प्रकाश माने, बांधकाम विभागाचे सदाशिव कदम, वैद्यकीय विभागाचे राजेंद्र बडदे आदी उपस्थित होते.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com