विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेतील मतभेद चव्हाट्यावर

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेतील मतभेद चव्हाट्यावर

पुणे, ता. २ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. नुकत्याच झालेल्या बैठकीत खोटी मंजुरी दाखवून सुरक्षारक्षक घेण्याच्या घोटाळा झाल्याचा आरोप व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी केला. मात्र, विद्यापीठाकडून हा प्रस्ताव नजर चुकीने आला होता. त्यात कुठलाही घोटाळा झालेला नाही, अशी माहिती काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी दिली आहे. पण यामुळे पुन्हा एकदा व्यवस्थापनातील अव्यवस्थापन उघड झाले आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीतही व्यवस्थापन परिषदेच्या कामकाजावर अधिसभा सदस्यांनीच नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा सुरक्षा रक्षक नियुक्तीबाबतच्या प्रस्तावावरून अधिसभा सदस्यांतच मतभेद असल्याचे दिसून आले. विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसमोर ठराव सादर करण्यात आला. याबाबत सागर वैद्य यांनी आक्षेप घेतला आहे. त्या संदर्भातील पत्र विद्यापीठाला देण्यात आले होते. या पत्रावर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, विद्यापीठाने हा प्रस्ताव मागे घेतल्यामुळे विषय पूर्णपणे संपला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com