अवती भवती

अवती भवती

अरिहंत महाविद्यालयात रोजगार मेळावा
पुणे, ता. २ : पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बावधन येथील अरिहंत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवारी (ता. ६) सकाळी १० ते दुपारी चार यावेळेत मोफत रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात साधारण ५०० जागांसाठी भरती होणार असून यात २० कंपन्या सहभागी होणार आहेत. तरुणांना नामवंत कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पदवीधर ते पदव्युत्तर प्राप्त सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्यासाठी रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन अरिहंत शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले आहे.

‘न्यायसंस्था’ विषयावर शनिवारी व्याख्यान
पुणे, ता. २ : कै. काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने येत्या शनिवारी (ता. ६) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक यांचे ‘न्यायसंस्थेची विश्वासार्हता’ या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता केसरीवाड्यातील लोकमान्य सभागृहात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव नाना ढबु यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com