मल्टिमोडल हबमुळे होणार
स्वारगेटचा कायापालट : मोहोळ

मल्टिमोडल हबमुळे होणार स्वारगेटचा कायापालट : मोहोळ

पुणे, ता. २ : ‘‘मल्टिमोडल हब प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो, पीएमपी व एसटी बस अशा अत्याधुनिक सुविधा प्रवाशांना मिळणार असून उद्योग-व्यवसायांना गती मिळणार आहे,’’ असा विश्वास पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मतदारसंघात तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, चव्हाणनगर, पद्मावती, शिवदर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन केले होते. यात आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, राजू शिळीमकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, अनिल जाधव, गणेश घोष, विशाल पवार, श्रुती नाझीरकर, विकास कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोहोळ म्हणाले, ‘‘भुयारी मेट्रो आणि स्वारगेटचे एसटी स्थानक या प्रकल्पामुळे एकमेकांशी जोडले जाणार आहे. मल्टिमोडल हबमध्येच पीएमपीचे राजश्री शाहू बसस्थानक होणार आहे. कुठूनही कुठे जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी मिळणार आहे. व्यावसायिक जागा विकसित केल्या जाणार आहेत. मॉल, मल्टिफ्लेक्स आणि इतर व्यवसायासाठी जागा दिली जाणार. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com