‘दगडूशेठ’ची विसर्जन मिरवणूक दुपारीच

‘दगडूशेठ’ची विसर्जन मिरवणूक दुपारीच
Published on

पुणे, ता. ३० ः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गेल्या वर्षीची परंपरा कायम ठेवत यंदाही विसर्जन मिरवणुकीच्या पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. ‘‘कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या भावना विचारात घेऊन तसेच धार्मिक परंपरा लक्षात घेऊन मागील वर्षीपासून मिरवणुकीची वेळ बदलली. पोलिस, प्रशासन, नागरिक आणि अन्य गणेश मंडळांनीही या निर्णयाला सहकार्य केले. त्यामुळे यंदाही तीच परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला’’, असे रासने यांनी सांगितले.
सूर्यवंशी म्हणाले, ‘‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. शनिवारी (ता. ७) सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना होणार आहे. प्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून गणरायाची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‍घाटन सायंकाळी सात वाजता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे’’.

गणेशोत्सवातील कार्यक्रम
- रविवारी (ता. ८) पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे सामुदायिक अथर्वशीर्ष पठण
- रात्री १० ते १२ वाजेपर्यंत ‘हरी जागर’च्या माध्यमातून वारकरी गजर
- दररोज पहाटे पाचपासून महाअभिषेक पूजा
- १६ सप्टेंबरला सामूहिक सत्यविनायक पूजा
- ‘जय गणेश आरोग्यसेवा अभियानां’तर्गत तीन ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि मंदिराजवळ आयसीयू सुविधा
- गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा
- सुरक्षेसाठी १५० सीसीटीव्ही कॅमेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com