अंबवडेत साकारणार पन्नासहून 
अधिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती

अंबवडेत साकारणार पन्नासहून अधिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती

Published on

पुणे, ता. ३१ : दिवाळी आली की पूर्वापार आपल्या घराघरांत बाळगोपाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करत असतात. पण आजच्या डिजिटल युगात मातीशी दोस्ती करत याच परंपरेला एक वेगळं रुप देत आहेत, परळी खोऱ्यातले किल्ल्यांचे गाव.
परळी खोऱ्यात असणाऱ्या अंबवडे गावाची ही आगळी-वेगळी ओळख ठरली ती १३ वर्षांपासून इथे होणाऱ्या एका अनोख्या परंपरेमुळे. सातारा जिल्ह्यातील परळी जवळील अंबवडे बुद्रूक गावात ‘मनवा फाउंडेशन’मार्फत दरवर्षी गावातली मुले एकत्र येऊन रायगड, राजगड, पन्हाळा, नळदुर्ग, अजिंक्यतारा, सिंधुदुर्ग, देवगिरी, जंजिरा अशा तब्बल ५०हून अधिक गड-किल्ल्यांच्या भव्य प्रतिकृती साकारतात. हे किल्ले साकारताना दगड, माती, शेण, लाकडाचा भुसा, ओंडके यांचा वापर केला जातो. त्यामुळे याचा निर्मिती खर्चही अतिशय कमी असतो. पण यातली कौतुकाची बाब अशी की, या स्पर्धेची तयारी ही मुले प्रत्यक्षात किल्ल्यांना भेट देऊन, त्यावर चर्चा करून, आराखडा ठरवून करतात. म्हणूनच या प्रतिकृती हुबेहूब तयार करणे शक्य होते. सुरुवातीला केवळ हौस म्हणून सुरु झालेला हा उपक्रम मुलांच्या उत्साहाने आज एका वेगळ्या वळणावर आला आहे. आज या गावाची ओळखच मुळात किल्ल्यांचे गाव अशी झाल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी सांगितले.
यंदा या गड- किल्ले स्पर्धेचे १३ वे वर्ष आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान हे किल्ले सगळ्यांसाठी पाहण्यास तयार असतील. या दरम्यान पोवाडे व इतर रंजक पद्धतीने या किल्ल्यांची माहिती ही मुले देणार आहेत. आपण मोठ्या संख्येने या किल्ल्यांच्या गावाला भेट द्यावी आणि या मुलांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन ‘सवाई मसाले’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com