एआयसीटीई की यूजीसी? कळविण्यास मुदतवाढ

एआयसीटीई की यूजीसी? कळविण्यास मुदतवाढ

पुणे, ता. १० : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता असलेले अभ्यासक्रम किंवा बी.कॉम.च्या धर्तीवरील नामकरण केलेले अभ्यासक्रम, या दोघांपैकी एकाच संस्थेचे अभ्यासक्रम महाविद्यालयांना राबविता येणार आहेत. यासंदर्भातील स्पष्टता महाविद्यालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे कळवायची असून, त्यासाठी बुधवार (ता. १२) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बीबीए, बीएमएस आणि बीसीए हे अभ्यासक्रम ‘एआयसीटीई’च्या अखत्यारीत आले आहे. त्यासाठी अनेक महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’कडून मान्यता प्राप्त केली आहे. अशा महाविद्यालयांनी तेच अभ्यासक्रम घेणे आवश्यक आहे. ज्या महाविद्यालयांनी ‘एआयसीटीई’ची मान्यता मिळवली नाही. अशांसाठी विद्यापीठाने संबंधित अभ्यासक्रमांचे बी.कॉम.च्या धर्तीवर नामकरण केले आहे. मात्र, अजूनही कोणत्या महाविद्यालयात नक्की कोणता अभ्यासक्रम आहे, याबद्दल विद्यापीठाकडे स्पष्टता नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या संलग्नता कक्षाचे उपकुलसचिव गिरीश बेत यांनी प्राचार्यांकडून यासंदर्भातील माहिती बुधवारपर्यंत पाठविण्यास सांगितले आहे. अभ्यासक्रमाबद्दलचा हा गोंधळ पाहता प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com