बाहेर पाऊस अन्‌ घरात अंधार

बाहेर पाऊस अन्‌ घरात अंधार

पुणे ता. ९ : शनिवारी (ता. ८) सायंकाळी पुण्यात पावसाने जोरदार बॉटिंग केली. विजांचा कडकडाट, वादळी वारा यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, शहरातील काही भाग चार तासांहून अधिक काळ अंधारात होता. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
गेल्या दोन दिवसांपासून मॉन्सून दक्षिण कोकणात मुक्कामी होता. पोषक वातावरण तयार असल्याने शनिवारी (ता. ८) मॉन्सूनने पुणे जिल्ह्यात मजल मारली. पावसाचा जोर खूप होता. झाडपडीच्या अनेक घटना घडल्याने विद्युत वाहिन्यांवर परिणाम होऊन वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोष शोधण्याचे काम हाती घेत दुरुस्ती सुरू केली.
पर्वती, अरण्येश्‍वर, मार्केटयार्ड, सॅलिसबरी पार्क, गोखलेनगर, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, सहकारनगर, बिबवेवाडी, धानोरी, श्रमिक वसाहत, साठे कॉलनी, शंकरशेठ रस्ता, बाजीराव रस्ता, स्वारगेट, मित्रमंडळ चौक, कल्याणीनगर, येरवडा या भागांत चार तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पर्वती, सुभाषनगर, दत्तवाडी परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम पहाटे उशिरापर्यंत सुरू होते.

पाणी साठल्यामुळे कामात व्यत्यय
शनिवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर, डीपी असणाऱ्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यास अडचणींचा सामना करावा लागला. मुख्य वीजवाहिनी सुरळीत केल्यानंतरही उच्च दाब वीजवाहिन्या, ट्रान्सफॉर्मर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले.

वाहतूक कोंडीचाही परिमाण
वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मिळताच महावितरणचे अभियंता-कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, शहरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला.

पर्वती भागातील हायपॉवर ट्रान्सफॉर्मरची केबल जळाल्याने वीजपुरवठा शनिवारी (ता. ८) ३ वाजल्यापासून खंडित झाला होता. जोरदार पावसामुळे कामात व्यत्यय येत होता. रविवारी (ता. ९) दुपारी पावणेबारा वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.
- दिलीप अरुंदेकर, नागरिक

शनिवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत काम करून सुरळीत करण्यात आला. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे, तर वाहतूक कोंडीमुळे वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले.
- निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com