बांबू डोक्यात पडून 
मजूर युवतीचा मृत्यू

बांबू डोक्यात पडून मजूर युवतीचा मृत्यू

पुणे, ता. ९ ः नियोजित गृहप्रकल्पावर काम करणाऱ्या १७ वर्षीय युवतीच्या डोक्यात बांबू पडून तिचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्री शंकर वडत्या (वय १७, रा. पोकळेवस्ती, धायरी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.
दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदार मुबारक मल्लीकसाब जमादार (वय ३५, रा. गोकाक, कर्नाटक) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी विशाल गवळी यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रस्ता परिसरात लक्ष्मी सदन इमारतीचे काम सुरू होते. तेथे श्री ही तरुणी मजुरी करत होती. बांधकामाच्या ठिकाणी पहाड बांधलेला होता. अचानक पहाडातील एक बांबू तुटला आणि तिच्या डोक्यात पडला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तपासात ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com