पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव शुक्रवारपासून रंगणार

पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सव शुक्रवारपासून रंगणार

पुणे, ता. १० ः कलाश्री संगीत मंडळ आणि औंध सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे शुक्रवार (ता. १४) ते रविवारी (ता. १६) या कालावधीत ‘पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. औंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अभिजित गायकवाड आणि कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष पं. सुधाकर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
याप्रसंगी कलाश्री संगीत मंडळाचे मिलिंद कांबळे, सचिदानंद कुलकर्णी, अरविंद पाटील, शिरीष नाईक आदी उपस्थित होते. महोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून, हा महोत्सव औंध येथील पं. भीमसेन जोशी कलामंदिरात दररोज सायंकाळी ५ वाजता होणार आहे. महोत्सवात शुक्रवारी श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर रुचिरा केदार (गायन), साहाना बॅनर्जी (सतार), सावनी तळवलकर (तबला), अनुजा बोरुडे (पखवाज) आणि आदिती गरडे (संवादिनी) या कलाकारांचे सादरीकरण आणि भुवनेश कोमकली यांचे गायन होणार आहे.
शनिवारी (ता. १५) शाश्वती चव्हाण यांचे शास्त्रीय गायन, अक्रम खान यांचे एकल तबलावादन आणि देवकी पंडित यांच्या शास्त्रीय गायनाची पर्वणी रसिकांना मिळेल. अखेरच्या दिवशी, म्हणजे रविवारी गायक अर्शद अली खाँ यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यानंतर शर्वरी जमेनीस यांच्या कथ्थक नृत्य सादरीकरणाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवादरम्यान यंदाचा ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार’ पं. सतीश तारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com