पावसाळी कामांचा आढावा 
घेऊन अतिक्रमणे काढावीत

पावसाळी कामांचा आढावा घेऊन अतिक्रमणे काढावीत

पुणे, ता. १० : शहराच्या गावठाण, मध्यवस्तीतील पावसाळी सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता झाल्याच्या कामाचा आढावा घ्यावा, तसेच रस्‍त्यावरील पाणी वाहत जाण्यासाठी अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
तिवारी यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांच्या पावसाने शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. तसेच शहराच्या मध्य वस्तीतून व उतारसदृश भागातून मुठा नदी वहात असल्याने पावसाचे पाणी उतारावर मोठ्या प्रमाणात वाहत येते. त्यामुळे नदीपात्राकडे जाणारी पावसाळी गटारे युद्धपातळीवर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. तसेच अनेक ठिकाणी फायबर व टीव्ही तसेच इंटरनेट कनेक्शनच्या केबलचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. त्या विषयी धोरण ठरणे गरजेचे आहे. तसेच निकामी व बंद पडलेल्या केबलचा गुंता अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेला आहे. त्याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना आदेश देऊन त्यांच्याकडून कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने आदेश द्यावेत. तसेच पावसाळी वातावरणात नागरिक खासगी दुचाकी वाहने कमी वापरतात, ही बाब लक्षात घेता मेट्रो स्थानकाजवळ वाहन पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी. साठणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावर उभी असणारी बेवारस वाहने, अतिक्रमणे तातडीने काढून टाकावीत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com