रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग

रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेग

पुणे, ता. ११ ः पावसाळा सुरू झाल्याने शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनातर्फे प्रमुख रस्त्यांसह इतर रस्त्यांचे रिसरफेसींग करण्याचे काम सुरू आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने या कामाला गती आलेली आहे. १ मार्च ते १० जूनपर्यंत १६ हजार ३२५ टन डांबरमिश्रित खडीचा वापर करून सुमारे ५ हजार ८०० चौरस मीटर रस्त्यांचे रिसरफेसिंग करण्यात आले आहे.
येरवड्यातील महापालिकेच्या हॉटमिक्स प्लांटवरून रोज सुमारे ६०० ते ७०० टन माल उचलला जात आहे. मुख्य पथ खात्यासह १५ क्षेत्रीय कार्यालयांना ही डांबर मिश्रित खडी दिली जात आहे. जे रस्ते जुने झाले आहेत, खोदाईमुळे खचले आहेत, खड्डे पडले आहेत तेथे ही खडी अंथरूण त्यावरून रोडरोलर फिरवले जात आहे. काही ठिकाणी एकाच वेळी १०० ते २०० मिटर लांबीचा रस्ता रिसरफेसिंग करून मजबुती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पथ विभागाचे प्रमख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘पथ विभागातर्फे एक मार्चपासून शहरात खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत १६ हजार ३२५ टन डांबर मिश्रित खडीचा वापर करून रस्ते रिसरफेसिंग, खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. आत्तापर्यंत सुमारे ५ हजार ८०० चौरस मीटरचे रिसरफेसिंग झाले असून, सुमारे ५ हजार खड्डे बुजविले आहेत. पाणी साचणाऱ्या ११ ठिकाणांवर स्वच्छता केली आहे. ११२ चेंबर उचलून घेतले आहेत.

पावसात खड्डे पडण्याचा धोका
पुण्यात आत्तापर्यंत दोन वेळा मुसळधार पाऊस पडून गेला आहे. त्यामुळे रस्त्याची खडी निघाली आहे. संततधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रस्त्यांची चाळण होण्याचे प्रमाण शहरात वाढते. महापालिकेकडून दरवर्षी रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत असा दावा केला जातो, पण हा दावा फोल ठरतो. रस्त्यांची चाळण झाल्यानंतर पुन्हा भर पावसात रस्ता ओला असताना डांबर टाकले तरी त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे आत्ताच चांगल्या दर्जाची कामे करण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com