फसवणूकप्रकरणी जमीन फेटाळला

फसवणूकप्रकरणी जमीन फेटाळला

पुणे, ता. ११ : शेअर बाजारात गुंतवणुकीस भाग पाडून महिलेची ३५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एस. आर. नरावडे यांनी हा निकाल दिला.
सलमान मन्सूर शेख (वय २३, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह एकूण सात जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याबाबत पाषाण येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी बाजू मांडत जामिनास विरोध केला होता. एका व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲॅडमिनने ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदीमधून आकर्षक परतावा देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले. त्यानुसार त्यांनी ३१ लाख ६० हजार रुपये गुंतविले. त्यांनी वेळोवेळी परतावा मागितला. मात्र, त्यांना देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी रक्कम परत मागितली. रक्कम परत हवी असेल, तर चॅरिटी डोनेशन स्वरूपात चार लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com