‘पीएमपी’ने तरुणाला फरफटत नेले

‘पीएमपी’ने तरुणाला फरफटत नेले

पुणे, ता. ११ : मामासोबत दुचाकीवर कॉलेजला निघालेल्या तरुणीला अपघातात पीएमपी बसने दहा ते बंधरा फूट फरफटत नेले. अपघातात तरुणीचा खुबा आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली. पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणीकंद परिसरात सोमवारी (ता. १०) हा अपघात झाला.
ज्ञानेश्वरी असे अपघातात जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत शिवराम बन्सी कराड (वय ३८, रा. लोणी स्टेशन, सोलापूर रस्ता) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्ताराम रमेश कांबळे (वय ३४, रा. गंगानगर फुरसुंगी, हडपसर) आणि सोमनाथ बाळासाहेब बसाटे (वय ४५, कवडीपाट टोलनाका, पुणे-सोलापूर रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवराम कराड हे सोमवारी भाची ज्ञानेश्वरी हिला घेऊन तिच्या महाविद्यालयात निघाले होते. सोलापूर रस्त्यावरून ते हडपसरकडे जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार दत्ताराम कांबळे भरधाव वेगाने सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आला. त्यावेळी दुचाकीस्वार कांबळे याने दुचाकीस्वार कराड यांना धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार कराड आणि त्यांची भाची ज्ञानेश्वरी रस्त्यावर पडले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या पीएमपी बसने ज्ञानेश्वरीला दहा ते बारा फूट फरफटत नेले. अपघातात ज्ञानेश्वरीचे दोन्ही खुबे आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली. तर कराड यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com