मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

पुणे, ता. ११ : कोरेगाव पार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून तीन तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मसाज पार्लर चालक महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
श्‍वेता ऊर्फ शिल्पा प्रकाश पगार (वय ३०, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) आणि वैशाली मेहता (रा. वाघोली) अशी गुन्हा दाखल केलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार सपना जाधव यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोरेगाव पार्क परिसरातील विवा स्पा मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्‍विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तेथे छापा टाकला.
पोलिसांनी मसाज पार्लरमधून नागालॅंड, पश्‍चिम बंगालमधील दोन तरुणीसह तिघींना ताब्यात घेतले. मसाज पार्लर चालक पगार आणि मेहता यांनी पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com