
पुणे, ता. १० : नवकार आर्ट फाउंडेशनतर्फे जैन समाजातील ४० चित्रकारांनी रेखाटलेल्या ९० चित्रांचे प्रदर्शन रविवार (ता. १२) ते मंगळवार (ता. १४) या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी सकाळी १०.३० वाजता कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, सुरेश लोणकर, ‘सरहद, पुणे’चे संस्थापक संजय नहार, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.