संस्थाचालक मंडळाच्या
अध्यक्षपदी विजय कोलते

संस्थाचालक मंडळाच्या अध्यक्षपदी विजय कोलते

Published on

धनकवडी, ता. १० ः पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी विजयराव कोलते तर उपाध्यक्षपदी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड व अनिल मेहेर यांची निवड झाली. संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. त्यात २१ जणांचे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले. सचिवपदी ॲड. संग्राम कोंडे देशमुख, खजिनदारपदी महेश ढमढेरे व सहसचिवपदी वीरसिंह रणसिंग यांची बिनविरोध निवड झाली. कार्यकारिणीवर संचालक म्हणून निवड झालेले ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, संग्राम मोहोळ, गणपत बालवडकर, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, प्रा. नंदकुमार निकम, महादेव कांचन, संदीप कदम, जयश्री पलांडे, शिवाजी खांडेकर, भाऊसाहेब ढमढेरे, प्रवीण भोसले, अजित वडगावकर, डॉ. राजेंद्र कांबळे, नंदकुमार शेलार व सल्लागार मंडळाचे अध्यक्ष वि. ल. पाटील उपस्थित होते. या संस्थेमार्फत नवीन शिक्षक व शिक्षकेतर भरतीबरोबरच विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. संस्थांचे असणारे अनेक प्रश्न राज्य शासन व शिक्षण विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून सोडवण्यात येतील, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. पर्वती येथील शाहू कॉलेज येथील सभागृहात कार्यकारी मंडळाची सभा पार पडली. ॲड. प्रदीप वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. ॲड. संग्राम कोंडे देशमुख यांनी आभार मानले.
फोटो ः 59012

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com