स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे 
निखळपणे पाहण्याचा अभाव
मिलिंद जोशी यांचे मत, डॉ. किन्हाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याचा अभाव मिलिंद जोशी यांचे मत, डॉ. किन्हाळकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

Published on

पुणे, ता. २७ ः स्त्री-पुरुष मैत्रभावाचा संबंध कायम लैंगिकतेशीच निगडीत असतो असे नाही. स्त्री-पुरुषांमधील मैत्रीकडे निखळपणे पाहण्याची निकोप मानसिकता प्रगत समाजातही अभावानेच दिसते. आपल्या जवळची माणसे आपल्याला न उमजणे ही जीवनाची शोकांतिका आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
‘शी लिव्हज्‌ ऑन’ या डॉ. उमा त्रिलोक लिखित पुस्तकाचा ‘ती आहेच..’ या अमृता प्रीतमच्या नंतरचे इमरोज या मराठीत अनुवादीत डॉ. वृषाली किन्हाळकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रा. जोशी अध्यक्षपदावरून बोलत होते. अनुबंध प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले आहे.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, रक्ताचे नाते असो वा मैत्रीचे ते विश्वास आणि निरपेक्ष प्रेमामुळेच बळकट होते. पैसा सर्वस्व झालेल्या आजच्या समाजात नात्यातली गुंतवणूक दुय्यम ठरते आहे. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नात्यातली गुंतवणूकही तितकीच महत्त्वाची आहे. अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्यातील नात्याने कधी बौद्धिक सहजीवनाची भूक भागविली तर कधी आयुष्यातले रितेपण भरून काढले. त्यातूनच कधी जगण्याला नवा अर्थ दिला.’’
रविमुकुल म्हणाले, अमृता प्रीतम यांच्या साहित्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘ती आहेच..’ या पुस्तकाचा उपयोग होईल.
डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी पुस्तकामागील भूमिका विशद केली. अनुबंध प्रकाशनाच्या अस्मिता कुलकर्णी यांनी प्रकाशन संस्थेची वाटचाल उलगडली. प्रा. मेघना यंदे-गुमटे यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो ः 43830

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com