‘एआय’वर फॅकल्टी
डेव्हलपमेंट प्रोग्रॉम

‘एआय’वर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॉम

Published on

पुणे, ता. २९ : ‘एआयएसएसएमएस’ संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशित्रण परिषदेअंतर्गत (एआयसीटीई) ‘ट्रेनिंग अॅण्ड लर्निंग’ योजनेअंतर्गत ‘जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या विषयावर एक आठवड्याचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नुकताच उत्साहात झाला.
या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, ट्रान्सफॉर्मर्स, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, डिफ्यूजन मॉडेल्स, व्हेरिएशनल ऑटो-एनकोडर्स, जनरेटिव्ह अॅडव्हर्सरियल नेटवर्क्स, टेक्स्ट-ऑडिओ-व्हिडिओसाठी मल्टिमोडल एआय, तसेच ‘एनईपी २०२०’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन झाले. त्यात कुशल शर्मा, नितीश कुमार, डॉ. विजय नलमोथू, ऋत्विज सिंग, शिवसिंग पटेल आणि डॉ. अशोक मटानी आदींनी मार्गदर्शन केले. औद्योगिक भेटीच्या निमित्ताने सहभागी प्राध्यापकांनी एस. एस. खर्डेकर प्रा. लि., पीएचएन टेक्नॉलॉजी आणि प्रुशाल टेक्नॉलॉजी प्रा. लि. येथे भेट दिली.
या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एस. एस. सोनवणे तर सहसमन्वयक आर. बी. गुरव यांनी जबाबदारी पार पाडली. एआयएसएसएम सोसायटीचे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com