व्लॉगिंग कार्यशाळा
पुणे, ता. ३० : सोशल मीडियाच्या जगात फॉलोअर्सशी कनेक्ट होण्यासाठी व्हिडिओ सामग्री ऑनलाइन तयार करणे आणि शेअर करणे म्हणजेच व्लॉगिंग करणे लोकप्रिय माध्यम ठरत आहे. लाईफस्टाईल, ट्रॅव्हल, फूड या प्रकारातील व्लॉग पैसे कमावण्याचे माध्यमही आहेत. ज्यांना या प्रकारामध्ये रस आहे व स्वतःची सर्जनशीलता व्लॉगच्या माध्यमातून पुढे आणायची आहे, अशांसाठी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १४ सप्टेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मची मूलभूत माहिती, व्लॉग शूट करण्याचा निर्णय कसा घ्यावा (पूर्वनिर्मिती), व्लॉग कसा शूट करायचा (उपकरणे, कॅमेरा वर्क), व्लॉग एडिटिंग, थम्बनेल, टायटल, साउंड, ग्राफिक्स कसे ॲड करायचे, व्लॉग कसा पॅकेज करायचा, व्लॉगिंग क्षेत्रात भविष्यातील संधी आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. कार्यशाळेदरम्यान प्रत्यक्ष नमुना व्हिडिओ शूट करून त्यावर चर्चा व शंकानिरसन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
युट्यूब, इन्स्टाग्रामसह वाढवा व्यवसाय
स्वतःचा उद्योग, व्यवसाय, व्यापार पुढील स्तरावर नेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ सप्टेंबरला आयोजिली आहे. यात स्वतःच्या उद्योग-व्यवसायाचा ब्रँड वाढवण्यासाठी युट्युब आणि इन्स्टाग्राम कसे वापरायचे, प्लॅटफॉर्म अल्गोरिदम, ट्रेंड आणि सामग्री निर्मिती (कन्टेन्ट क्रिएशन) समजून घेऊन शूटिंग, संपादन (एडिटिंग) आणि अपलोडिंग कसे करायचे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उत्पादन टॅगिंगद्वारे पैसे कसे कमवायचे आणि ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची, विविध यशोगाथा आणि भविष्यातील ट्रेंडपासून प्रेरणा कशी घ्यायची याबाबतही उपयुक्त माहिती दिली जाणार आहे. स्वतःच्या व्यवसायाची ऑनलाइन माध्यमांचा वापर करून भरभराट करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी मिळवून देणारी ही कार्यशाळा असणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
लँडस्केप डिझाईनिंग अभ्यासक्रम
विमानतळ, शहरातील रस्ते, चौक, व्यावसायिक ठिकाणे, हॉटेल्स, उद्याने, रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्थांचा परिसर इथपासून ते घराचा एखादा छोटासा कोपरा जिवंतपणे सुशोभित करण्यासाठी ‘लँडस्केप प्लॅनिंग व डिझायनिंग या विषयातील कौशल्य आत्मसात करून त्यात करिअर करण्याला भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरी करणारा वर्ग, आर्किटेक्चर पदवीधर, स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर त्याचबरोबर लँडस्केप कन्सल्टंट यांना डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आली आहे. यामध्ये झाडे-झुडुपे, वेलींचा लँडस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर, मियावाकी प्लांटेशन पद्धतीचे महत्त्व, रस्ते, उद्याने, मोकळ्या जागेत लँडस्केप नियोजन, लँडस्केपसाठी बांधकाम रचना, नियोजन, साइट प्लॅनिंग व लँडस्केप प्रोजेक्ट डिझायनिंग, लँडस्केपिंगसाठी अंदाजे खर्चाचे नियोजन, ऑटोकॅड सॉफ्टवेअर, पर्यावरणीय आणि कायदेशीर पैलू, औद्योगिक क्षेत्रातील जैवविविधता व तेथील प्लांटेशनचे नियम आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.