निर्माल्य संकलनासाठी १२५ विद्यार्थी स्वयंसेवक
पुणे, ता. २ : ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने आणि ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड’च्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी (ता. ६) पुण्यातील प्रमुख पाच विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घाटावर २५ याप्रमाणे १२५ विद्यार्थी स्वयंसेवक मोहिमेत सहभागी होणार आहेत.
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे या उपक्रमास सहकार्य लाभले आहे. निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्याचे ‘सकाळ सोशल फाउंडेशन’चे हे सलग अकरावे वर्ष असून फाउंडेशनच्या वतीने २०१२ पासून उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुठा नदीवर पाच विसर्जन घाटांवर विद्यार्थी स्वयंसेवक थांबून निर्माल्य संकलन व जनजागृती करतील. याशिवाय प्रत्येक घाटावर ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पुणे प्राइड’ यांच्यातर्फे जनजागृती व प्रबोधनात्मक निर्माल्य संकलनाचे फलक लावणार आहेत.
निर्माल्य संकलन या उपक्रमाचा मुख्य उद्देश जनजागृती व प्रबोधन हा आहे. या उपक्रमात विद्यार्थी साहाय्यक समितीचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार असून, विसर्जन घाटांवर पुणे महापालिकेच्या सेवकांना निर्माल्य संकलन करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. या उपक्रमात सामान्य नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या ठिकाणी मोहीम
१) सिद्धेश्वर घाट
२) वृद्धेश्वर घाट
२) पुलाचीवाडी घाट
३) पांचाळेश्वर घाट
४) एस. एम. जोशी घाट (नदीकडील दोन्ही बाजू)