रावेत-नऱ्हे ते देहू उन्नत मार्गाला मंजुरी

रावेत-नऱ्हे ते देहू उन्नत मार्गाला मंजुरी

Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ४ : रावेत- नऱ्हे ते देहू रस्ता या उन्नत (एलिव्हेटेड) मार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरी देत प्रकल्प अहवालात बदल करून पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) मुंबई-बंगळूर महामार्गावरील (एनएच ४८) वाढलेली वाहतूककोंडी कमी करण्यासाठी गेल्यावर्षी या पर्याय उड्डाणपुलाचे काम हाती घेतले. त्यानुसार या उन्नत मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयास सादर करण्यात आला होता. या संदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक झाली. यात प्राधिकरणाकडून या संदर्भातील अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. त्यास गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता देत काही बदल सुचवून तो पुन्हा सादर करण्याच्या सूचना प्राधिकरणाला दिल्या असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून अथवा बंगळूरहून मुंबईकडे जाणारी वाहने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून जातात, ती सर्व वाहने या मार्गाने जातील, त्यामुळे या दोन्ही शहरांतील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

उन्नत मार्गाची माहिती
३२ किलोमीटर
- लांबी

५,५०० ते ६,००० कोटी रुपये
- किंमत

- दोन टप्प्यांत
कसा होणार?

देहू रोड ते पाषाण-सूस
- पहिला टप्पा

पाषाण-सूस ते नऱ्हे
- दुसरा टप्पा

पुणे, पिंपरीतील कोंडी कमी करणे
- उद्दिष्ट

१२ मीटर रुंदीचे सेवा रस्ते २४ मीटर करणार
- सेवा रस्ते

प्रकल्पाची सद्यःस्थिती
या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असून त्यामध्ये किरकोळ बदल करून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com