ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटकडे शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांचा कल
पुणे, ता. ४ : एमबीएऐवजी केवळ ३६५ दिवसांत ‘पोस्ट ग्रॅज्युएट ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम करिअरसाठी दिशादर्शक ठरतोय. यात अनुभवी इंडस्ट्री तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, सहा महिने नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिप, नोकरीसाठी साहाय्य आणि विशेष म्हणजे शुल्कात शिष्यवृत्तीद्वारे सवलत इ.मुळे यंदा या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे. राज्यभरातून प्रवेशाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
देशातील नामांकित दीपक फर्टिलायझर्स आणि पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशन लि.अंतर्गत ईशान्य फाउंडेशनने या अभ्यासक्रमाची दखल घेऊन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्तीची तरतूद केली आहे. हा अभ्यासक्रम खास २१ ते २६ वयाच्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी असून याद्वारे विद्यार्थी केवळ नोकरीच नाही तर स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळवू शकतात.
सध्या मार्केटमध्ये जर्मन, जापनीज भाषेसहीत ॲग्रिकल्चर एक्स्पोर्ट, फूड व डेअरी टेक्नॉलॉजी, सप्लाय चेन मॅनेजमेंट, स्टार्टअप, मार्केट इंटिलिजन्स, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), हायड्रोपोनिक तंत्रज्ञान, डेटा ॲनॅलिटीक्स इ.विषयांचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भरपूर संधी आहेत. या सर्व विषयांचा समावेश यात असून विद्यार्थी स्वतःला अपस्किल करून नोकरीच्या विविध संधी मिळू शकतात. ७० टक्के प्रात्यक्षिकावर आधारित हा अभ्यासक्रम एमबीएलासुद्दा उत्तम पर्याय ठरत आहे. कोणत्याही शाखेच्या पदवीधरांसाठी (ग्रॅज्युएट) हा अभ्यासक्रम फायदेशीर आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१०९९७५७ व ८४८४८२२१६६
शिष्यवृत्तीमुळे मला खूप फायदा झाला. सध्या दीपक फर्टिलायझर्स उद्योगातील नामांकित ब्रॅण्ड महाधनमध्ये इंटर्नशिप करत असून इथेच नोकरीची संधी सुद्धा उपलब्ध झाली आहे.
- अजय कदम, विद्यार्थी (२०२४-२५)
अन्न तंत्रज्ञान विषयात पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण होती. शिष्यवृत्तीमुळे खूप मदत झाली. सध्या सुहाना मसाले उद्योगात इंटर्नशिप करत आहोत.
- श्रुती व्यवहारे व राहुल कदम, विद्यार्थी (२०२४-२५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.