भूमी अभिलेख विभागात ९०५ पदांची भरती

भूमी अभिलेख विभागात ९०५ पदांची भरती

Published on

पुणे, ता. १० : लघुलेखक, भूकरमापक (सर्वेअर) यांसह वेगवेगळ्या अशा एकूण ९०५ पदांसाठी भरती करण्यासाठी राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या महसुली विभागात रिक्त असलेल्या पदानुसार ही संख्या वाढविण्यात येणार आहे.
राज्य सरकारचा भूमिअभिलेख विभाग महसूल विभागात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येतो. त्यासाठी मागील दोन वर्षांपूर्वी राज्यात एक हजार २०० भूकरमापकांची पदभरती करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे सुमारे ७०० जणांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे विविध महसूल विभागात कार्यरत असलेली भूकरमापकांची पदे रिक्त झाली. त्याचा परिणाम मोजण्यावर होऊ लागला. अनेक मोजण्या प्रलंबित राहू लागल्या. ही बाब लक्षात घेऊन पुन्हा भूकरमापकांच्या भरतीसाठी भूमिअभिलेख विभागाच्या वतीने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव तत्त्वतः मान्य करण्यात आला आहे. दरम्यान, या पदांबरोबरच लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदांसाठीदेखील भरती करण्याबाबत सरकारने मान्यता दिली आहे.

भूमिअभिलेख विभाग पदसंख्या
- लघुलेखक (उच्चश्रेणी )--- २
- लघुलेखक (निम्न श्रेणी)--- ९

भूकरमापक (संवर्ग-क)
महसूल विभाग --- पदसंख्या
मुंबई---२५९
नाशिक ---- १२४
छ. संभाजीनगर---- २१०
अमरावती--- ११७
नागपूर ---११२
एकूण ----९०५
-------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com