‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ आजपासून
पुणे, ता. ११ : देश-विदेशातील पर्यटनस्थळांची माहिती आणि सवलतीच्या दरात टूर पॅकेज देणाऱ्या टूर कंपन्यांचा सहभाग असलेल्या ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ला शुक्रवारी (ता. १२) प्रारंभ होणार आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने या एक्स्पोचे आयोजन केले आहे.
जगभरातील भ्रमंतीची माहिती देणारा हा एक्स्पो १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे खुला असेल. उन्हाळी सुट्टी जवळ आल्यावर अनेकांना चाहूल लागते ती पर्यटनाची. भारतासह परदेशातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. मात्र, नेमके कुठे जावे?, किती बजेट हवे?, कोणती टूर कंपनी आपल्याला चांगला प्रवास घडवेल?, असे अनेक प्रश्न पर्यटकांच्या मनात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे पर्यटकांना एक्स्पोमध्ये मिळतील. त्यामुळे जगभ्रमंतीची इच्छा असलेल्यांसाठी ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’ पर्वणीच ठरणार आहे. या एक्स्पोसाठी ‘केसरी टूर्स’ मुख्य प्रायोजक असून, पॉवर्ड बाय ‘थॉमस कुक आणि ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’ आहेत. कॅप्टन नीलेश गायकवाड, एसओटीसी हे असोसिएट स्पॉन्सर्स आहेत.
दर वर्षी पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या सकाळ ट्रॅव्हल एक्स्पोचे केसरी टूर्स मुख्य प्रायोजक आहेत. त्यात पर्यटकांसाठी ‘अर्ली बर्ड बुकिंग’ची ही चांगली संधी आहे. दिवाळी दसरा आणि पुढच्या वर्षीच्या युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सहलीचे प्लॅनिंग आणि बुकिंग करण्याची योग्य वेळ आणि संधी आत्ता आहे. विंटर सिझनसाठी खूप सारे ऑप्शन्स असून त्यात ख्रिसमस मार्केट, अंटार्क्टिका, साउथ अमेरिका, नॉर्दर्न लाइट्स, दुबई, अबुधाबी, बाली फुक्वाक आणि हॉर्नबील फेस्टिव्हल आदींचा समावेश आहे. कमी किमतीत आताच सहल प्लॅन करण्याची ही सुवर्ण संधी आहे.
- झेलम चौबळ, संचालिका, केसरी टूर्स
सकाळ टुरिझम एक्स्पोमध्ये ‘पॉवर्ड बाय’ सहयोगी म्हणून सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना दर्जेदार सेवा, आकर्षक ऑफर्स आणि अविस्मरणीय अनुभव देणे हीच आमची वचनबद्धता आहे. विस्तृत हॉलिडे रेंज आणि ‘थॉमस कुक ट्रॅव्हशुअर’ सोबत प्रवास अधिक सुरक्षित व सोईस्कर ठरतो. आमच्यासोबत प्रवास करा आणि आपल्या स्वप्नातील डेस्टिनेशनचा आनंद घ्या.
- राजीव काळे, प्रेसिडेंट आणि कंट्री हेड, थॉमस कुक इंडिया लिमिटेड
सकाळ ट्रॅव्हल एक्स्पोमध्ये गिरिकंद ट्रॅव्हल्सने यंदाही सहभाग नोंदविला आहे. दसरा, दिवाळी, नाताळ आणि समर सीझनसाठी आकर्षक टूर पॅकेजेस अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे ते पुणे आणि मुंबई ते मुंबई ग्रुप टूर्ससोबतच कस्टमाइज्ड पॅकेजेसचीही सुविधा येथे आहे. पर्यटकांच्या विश्वासाला प्रतिसाद देत ‘पर्यटनाचा मनमुराद आनंद-गिरिकंद’ हा आमचा कायमस्वरूपी प्रयत्न आहे.
- अखिलेश जोशी, संचालक, गिरिकंद ट्रॅव्हल्स
हे लक्षात ठेवा
कधी : शुक्रवार, शनिवार आणि रविवार (ता. १२, १३ आणि १४)
कुठे : हॉटेल सेंट्रल पार्क, जंगली महाराज रस्ता (छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकापासून चालत काही मिनिटांवरच)
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
प्रवेश आणि पार्किंग मोफत. व्हॅले पार्किंगची सोय उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६७१ ०१२५८